जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कालिंका माता मंदीर परिसरातील नवल उत्तम पाटील रा. कांलिका माता मंदीरजवळ, जळगाव यांच्या कृष्णा फ्रुट व किरणा दुकानाला अचानक आग लागल्याची घटना रविवारी १२ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. या आगीत किराणा दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग कशामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. जळगाव महापालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असून ही आग विझविण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवल उत्तम पाटील रा. कांलिंका माता मंदीर परिसर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. याच परिसरात त्यांचे कृष्णा फ्रुट व किरणा दुकान आहे. दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी १२ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या दुकानातील साहित्य जळून नुकसान झाले आहे. ही लागल्यानंतर माजी नगरसेवक प्रवीण कोल्हे यांनी जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क करून आगीसंदर्भात माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन विभागाचे इकबाल तडवी, योगेश पाटील, तेजस जोशी, गिरीश खडके व चालक देविदास सुरवाडे हे घटनास्थळी बंब घेवून दाखल झाले. अवघ्या काही मिनीटात ही आग विझविण्यात आली. ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.