किनगाव बुद्रुकच्या सरपंच निर्मला पाटील यांनी दिला पदाचा राजीनामा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील सरपंच निर्मला संजय पाटील यांनी त्यांच्या सरपंच पदाचा राजीनामा सोमवारी येथील यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे.

१० जुन सोमवार रोजी ग्रामपंचायत मधील सत्ताधारी गटातील ठरलेल्या अंतर्गत ठरावानुसार सरपंच पदाची विभागणी नुसार निर्मला पाटील यांनी आपल्या राजीनामा दिला आहे. याप्रसंगी किनगाव बु॥ग्राम पंचायत च्या सदस्या सौ.स्नेहल मिलींद चौधरी, अलानुर छबू तडवी, प्रमोद रामराव पाटील, वंदना संजय वराडे, साधना राजेन्द्र चौधरी, भारती प्रशांत पाटील, शशीकला रंगराव पाटील यांच्यासह डॉ .योगेश पालवे, मिलींद चौधरी, समीर तडवी व संजय वराडे व इतर ग्रामपंचायत सदस्य व माजी आमदार रमेश चौधरी, प्रमोद पाटील, संजय पाटील उपस्थित होते.

Protected Content