किमो पॉलने पहिल्या कसोटीत घेतली माघार

pol

 

अँटिग्वा वृत्तसंस्था । भारताविरुद्धच्या पहिली कसोटी सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक असतांना यजमान वेस्ट इंडिजला धक्का बसला आहे. कारण वेस्ट संघाचा गोलंदाज किमो पॉलने माघार घेतली आहे.

सुत्रांकडून मिळलेली माहिती अशी की, ट्वेंटी-20 मालिकेत शिखर धवन, मनिष पांडे आणि कृणाल पांड्या या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवणारा गोलंदाज किमो पॉल याला पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. अष्टपैलू पॉलच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याने कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने मिग्युएल कमिन्सला स्थान दिले आहे. पॉलचा संघात सहभाग कायम असणार आहे, कारण दुसऱ्या कसोटीत तो तंदुरुस्त होईल अशी मंडळाला अपेक्षा आहे. ”किमो पॉलने पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्याजागी संघात कमिन्सला संधी देण्यात आली आहे. भारत संघाविरुद्धच्या सराव सामन्यात कमिन्सने चांगली कामगिरी केली होती” अशी माहिती वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फ्लोयड रेइफर यांनी दिली. 28 वर्षिय कमिन्सने तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्धच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या मालिकेत त्याने दुसऱ्या सामन्यात 102 धावा देत 9 विकेट्स घेतल्या होत्या. 6 बाद 48 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

Protected Content