नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात लोकशाहीची हत्या होत असून चार जणांच्या हुकुमशाहीने कळस गाठला असल्याची घणाघाती टीका आज खासदार राहूल गांधी यांनी केली आहे.
सोनिया व राहूल गांधी यांच्यासह ईडीने सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाने आज आक्रमक पवित्रा घेतला आहे. देशभरात आज कॉंग्रेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. तर राजभवनाला घेरा घालण्याची तयारी देखील करण्यात आली आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी बोलतांना खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली.
राहूल गांधी म्हणालेत की, देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे. कॉंग्रेसने जे ७० वर्षात कमावलं ते भाजपने ७ वर्षात गमावलं असल्याची टीका देखील त्यांनी केली. तर याप्रसंगी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले.