Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलाचे अपहरण; गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलाचे अपहरण; गुन्हा दाखल

0
145


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका भागात राहणाऱ्या तेरा वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची घटना सोमवारी ५ मे रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका भागात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगा हा आपला कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी ५ मे रोजी दुपारी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान तो घरी एकटा असताना त्याला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमीष दाखवत अपहरण केले आहे. ही घटना पीडित मुलाच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्याच्या पालकांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.


Protected Content

Play sound