जळगाव प्रतिनिधी । सुयोग कॉलनी येथील प्रगती ज्येष्ठ नागरिक संस्थेस खुला भुखंडाचा ताबा मिळवा यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दि. 8 जुलै रोजी आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, रामानंद रोड येथील सुयोग कॉलनी मधील प्रगती ज्येष्ठ नागरिक संघ संस्था ही 2006 पासून खुला भूखंड सुशोभित करीत आहे. सुधाकर भोळे यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून देत नागरिकांचे नो ऑब्जेक्शन घेत हा भूखंड संघास हस्तांतरित केला आहे. भूखंडाच्या विकासासाठी संघाने 4 ते साडेचार लाख रुपये खर्च केलेले असून नगरपालिकेने सुधाकर भोळे यांना दिले होता. परंतु त्यांचे 6 महिन्यापूर्वी निधन झाले आहे. या भूखंडावर मागील तीन वर्षापासून शुभांगी भोळे ह्या जुडो कराटे यांचा क्लास घेऊन विद्यार्थ्यांकडून फी आकारून चालवत आहेत. परंतु त्यांचे नातू मोफत शिक्षण घेत आहेत. या परिसराचे झाडलोट लाईट बिल भरणे, हे काम ज्येष्ठ नागरिक संघ करत असतो. मात्र गेट बंद, हनुमान मंदिर बंद असते. हनुमान मंदिराचे अंदाजे 30 हजार रुपये शिल्लक असून देखील त्याचा हिशोब मागितल्यास मी तुमचे येणे बंद करुन टाकेल असे धमक्या दिला जातात. म्हणून आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिक संघाला मदत करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनांवेळी अध्यक्ष रामकृष्ण महाजन, कोषाध्यक्ष प्रा. डी.जी गुळवे, सचिव उखर्डू गढरी व वसंत पाटील आदी उपस्थित होते.