चाळीसगाव येथे ‘निर्धार हरीतक्रांतीचा, वसा वृक्षसंवर्धनाचा’ मोहिम

40 gaon mihim

 

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात पर्यावरणाचा जागर करण्यासाठी शहरातील युनिटी क्लबच्या वतीने (दि. ४ जुलै) पासून ‘निर्धार हरीतक्रांतीचा, वसा वृक्षसंवर्धनाचा’ ही मोहीम राबविली जात आहे. यात बाजार समिती, शिवाजी नगर येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असून आज शहरातील विवेकानंद कॉलनी व जय शंकर नगर परिसरात सुमारे २० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी आई फाउंडेशन, ग्लोबल बिल्डर्स व युनिटी क्लबच्या संयुक्त विद्यमाने रोपण करण्यात आले असून रोप संरक्षणार्थसाठी लोखंडी संरक्षक जाळी बसविण्यात आल्यात. युनिटी क्लब ही एक स्वतंत्र संघटना असून या संघटनेमार्फत गेल्या वर्षापासून अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात दुभंगलेल्या गणेश मुर्ती संकलनातून विसर्जन असो, की दुर्गोत्सवातील निर्माल्य संकलन असो, यासह पर्यावरणाचा -हास थांबविण्यासाठी सीड बॅकेच्या माध्यमातून बिजारोपण करण्यात आले आहे. युनिटी क्लबच्या वृक्षारोपण चळवळीत आता महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून नारीशक्तीचा गजर या अभियानात होऊ लागल्याने खऱ्या अर्थाने आता सामाजिक समरसतेची जोड मिळाली असल्याचे युनिटी क्लबचे सदस्य स्वप्निल कोतकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी चाळीसगाव एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, उद्योजक मंगेश चव्हाण, नगरसेवक दिपक पाटील, घृष्णेश्वर पाटील, उद्योजक प्रमोद गुळेचा, रोटरी मिलेनियमचे अध्यक्ष संदीप जैन, विनोद गुळेचा, माजी जि.प.सदस्या सुनंदा पाटील, विमल चव्हाण, चमेली बऱ्हाटे, जिजा पाटील, मीना राजपूत, मीना येवले, उज्ज्वला चव्हाण, स्वाती पाटील, आकांक्षा येवले, सुधीर चव्हाण, राकेश कोतकर, योगेश सुर्यवंशी, मनोज बऱ्हाटे, योगेश पाटील, आदित्य चव्हाण आदी उपस्थित होते. मनिष मेहता, सतीश जैन, गितेश कोटस्थाने, गणेश सूर्यवंशी, प्रवीण बागड, हेमंत वाणी, भूपेंद्र शर्मा, बाळासाहेब शेंडे, निशांत पाठक, विनोद चौधरी, विशाल गोरे, स्वप्निल धामणे, राकेश राखुंडे, पियुष सोनगिरे, मनीष ब्राह्मणकर, किरण पाटील, निरज कोतकर, अभय राजपूत, इशू वर्मा, भूषण भामरे, निलेश सेठी, युवराज शिंपी, शाम मेतकर, पराग बागड, संजय दायमा, योगेश ब्राह्मणकर, निलेश शेंडे, स्वप्नील कोतकर आदी युनिटी सदस्यांच्या वतीने मोहीम राबविण्यात येत आहे.

Protected Content