सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव साजरा (व्हिडीओ)

bhuswal news

भुसावळ प्रतिनिधी । लाखो शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणारी, जळगाव जिल्ह्याची जीवनदायिनी सूर्यकन्या तापी या नदीचा जन्मोत्सव सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. अनोख्या परंपरेत तापी नदी काठालगतच्या गावांमध्ये देखील पूजन करण्यात आले. हतनूर धरणावर देखील पूजन करण्यात आले. याप्रसंगी चोपडा येथील अभियंता ए.जे. निकम, शाखा अधिकारी एन. पी. महाजन, सावदा शाखा अधिकारी व्ही. बी. नेमाडे, एम.एम. पाटील यांसह धरणावरील कर्मचारी उपस्थित होते.

पारंपारिक पध्दतीने साडी अर्पण
तापी नदीचा जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा नेमकी कधी व कोणी सुरु केली, याबाबत ठोस असे पुरावे नसले तरी प्राचीन काळापासून नदीचे पूजन करण्याची परंपरा असल्याचे सांगण्यात येते. दरम्यानच्या काळात तापी नदी काठावरील गावांमध्ये राहणाऱ्या महिला देवी तापीच्या नावाने तीन दिवसांचा उपवास करतात. पंचमीपासून सुरु होणारे हे उपवास सप्तमीला सोडवले जातात. उपवास सोडण्यापूर्वी त्यांच्याकडून तापी महात्म्याचे वाचन करतात. शेवटचा अध्याय सप्तमीला तापी नदीला साडी अर्पण करण्यापूर्वी वाचून पूजन करण्यात येत़े नदीवर होणाऱ्‍या या पूजनात तापीला सप्तश्रृंगार अर्पण करण्यात येऊन विधीवत आरतीपूजन करण्यात येते. यावेळी काठावर असंख्य महिला उपस्थित राहून उपवास सोडवतात. भाविकांसाठी विशेष पर्वणी असलेल्या या जन्मोत्सवानिमित्त जोडप्यांच्या हस्ते पूजन, अन्नदान यासह होमहवनही करण्यात येते. नवस फेडणारे याठिकाणी हजेरी लावतात.

 

Protected Content