आदीवासी पाड्यावर खावटी वाटप कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलले; योगेश भंगाळे यांची तक्रार

यावल प्रतिनिधी । शहरातील एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत खावटी वाटप वितरण कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याची तक्रार यावल पंचायत समिती उपसभापती योगेश भंगाळे यांनी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांच्याकडे केली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, रावेर आणि यावल तालुक्यातील आदीवासी क्षेत्रातील आदिवासी वस्ती, पाडयांवर मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी आदीवासी बांधवांना शासनाच्या वतीने मिळणारे खावटी कर्जवाटप करण्यात येते. मात्र खावटी वाटप कार्यक्रमात स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांना एकात्मीक कार्यालयाच्या कुठलीही सुचना किंवा माहीती न देता कर्जवाटपाचे कार्यक्रम घेण्यात आला आहे. तसेच यावल पंचायत समितीच्या मागील मासिक सर्वसाधारण सभेत आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी हजर असतांना यावेळी पंचायत समितीच्या सन्मानिय सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती व सदस्यांनी त्यांना शासनाच्या नियमाविषयी जाणीव करून दिली व आपली नाराजी व्यक्त केली होत.  दरम्यान उपसभापती योगेश दिलीप भंगाळे यांनी एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर आपली खंत व नाराजी व्यक्त केली आहे.

Protected Content