पारोळा प्रतिनिधी | खरीप पणन हंगाम २०२१-२२ ज्वारी, मका व बाजरी (भरडधान्य) खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यासमयी ज्वारी – २७३८ प्रति क्विंटल, मका – १८७० प्रति क्विंटल व बाजरी – २२५० प्रति क्विंटल असा हमी भाव असुन याची उत्पादकता (हेक्टरी) ज्वारी -८.२१ क्विंटल, मका – १९.३९ क्विंटल, बाजरी – ४.५२ क्विंटल अशी आहे. संघात ज्वारीकरिता – ५८७, मकाकरिता ६० व बाजरी करिता – ८ शेतकऱ्यांनी नांव नोंदणी केलेली असून नोंदणी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या संपर्क क्रमांकावर एस.एम.एस.व्दारे पूर्वसूचना दिल्या जातील. व त्याप्रमाणे मोजणी केली जाईल अशी माहीती शेतकरी संघाचे व्यवस्थापक भरत पाटील यांनी दिली.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, तहसिलदार अनिल गवांदे, बाजार समितीचे उपसभापती दगडू पाटील, संचालक चतुर पाटील, प्रा.बी.एन.पाटील, मधुकर पाटील, शेतकी संघाचे चेअरमन अरूण पाटील, व्हा.चेअरमन सखाराम चौधरी, जिजाबराव पाटील, मा.चेअरमन डॉ.राजेंद्र पाटील, मा.व्हा.चेअरमन भिकन महाजन, संचालक सुधाकर पाटील, बाजार समिती सचिव रमेश चौधरी, संजय गांधी निराधार समिती सदस्य दादा पाटील, पळासखेडे सरपंच विनोद पाटील, बापू मराठे, पंकज मराठे, सतिष महाजन यांसह शेतकी संघ व बाजार समितीचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती.