फैजपूर येथील खंडोबा महाराज यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । फैजपूर शहरासह महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराजांचा आठ दिवसीय यात्रा महोत्सव आज, फाल्गुन शुद्ध होळी पौर्णिमेपासून सुरू होत आहे. दि.१७ ते २४ मार्च २०२२ या कालावधीत हा यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे.

दरम्यान, आज सकाळी 7 वाजत विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी खंडेराय देवस्थनाचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज, प्रांतधिकारी कैलास कडलग गावातील नागरिक उपस्थित होते.

प्राचीन पुराणात मनी व मल्ल्या असुरांच्या त्रासापासून देवांचा मानवजतीला मुक्त करण्यासाठी श्री खंडेराव महाराज हे साक्षात शंकरांचे एक अवतारकार्य  होय श्री खंडेराव महाराज हे ऐतिहासिक आध्यात्मिक नागरी असलेल्या फैजपूर शहरासह महाराष्ट्राचे कुलदैवत  आहे श्री खंडोबा भगवानाची नगरी जेजुरी नंतर सर्वात मोठी यात्रा म्हणजे फैजपुर खंडोबाची यात्रा भारत भरा सह जगप्रसिद्ध आहे. मंदिराचा प्रतिस्थापना दिवस म्हणून फाल्गुन शुद्ध होळी पौर्णिमा पासून सलग आठ दिवस यात्रा महोत्सव म्हणून साजरा केला जातो ती धार्मिक परंपरा फैजपूर शहरवासीयांनी आजही जपली आहे. सदर यात्रा महोत्सवात गुळाची रेवडी व जिलेबी, महाकाय विद्युत पाळणे, रात्रीचे तमाशा मंडळ यात्रा महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरते.

फैजपुर खंडोबाची यात्रा व देवस्थानास सुमारे साडेपाचशे वर्षा पूर्वी चा धार्मिक ऐतिहासिक इतिहास आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील फैजपूर १९३६ च्या प्रथम कांग्रेस अधिवेशन जगभरात प्रसिद्ध झाले आहे या निमित्त येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभाई पटेल, डॉ राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, सरहद्द गांधी ,साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक तथा खान्देशातील  प्रति जेजुरी फैजपूर खंडोबा देवस्थान होय. या पुरातन जागृत देवस्थानाला परमपूज्य अहिल्याबाई होळकर, राजा छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा ,कवयित्री बहिणाबाई चौधरी यासह अनेक थोर संतांनी राष्ट्र भक्तांनी आवर्जून भेटी दिल्याच्या नोंदी आहेत. आजही या मंदिरास मध्य प्रदेशातील इंदूर येथील सुप्रसिद्ध होळकर घराण्याची सनद प्राप्त होते. या मंदिराचे तत्कालीन ब्रह्मलीन गादीपती परमपूज्य आत्मानंद महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आचार्य विनोबा भावे सोबत भूदान आंदोलनात तर साकेत वाशी ब्र. घनश्यामदास जी ब्रह्मचारी महाराज यांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात आमदार सिंधुताई पार्थ चौधरी सोबत गोवा मुक्ती आंदोलनात सिंहाचा सहभाग घेतलाची नोंद आहे. घनश्याम महाराज हे फैजपूर नगर परिषदेमध्ये अखंडितपणे ३५ वर्ष नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधीत्व केले आहे.

मंदिराच्या धार्मिक आख्यायिका 

येथून जवळच असलेल्या न्हावी गावात श्री खंडोबाच्या मंदिरासाठी प्रतिष्ठापना होत असलेली खंडोबाची मूर्ती राजस्थान इथून बैलगाडी द्वारे आणत असलेली भाविक मंडळी या ठिकाणी विहिरीवर असलेल्या झाडाखाली विसाव्यासाठी थांबले असता नंतर गाडी गावाकडे मार्गस्थ होत असताना सदर बैलगाडी ही मोठ्या अथक परिश्रमातून ही जागेची तसूभर सुद्धा हलली नाही. याप्रसंगी काही भाविकांना साक्षात खंडोबा भगवान यांनी या जागीच मंदिर बांधून माझी प्रतिष्ठापना करावी, यामुळे न्हावी-  फैजपूर येथील भाविकांची एक बैठक होऊन सदर खंडोबाचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला समस्त दानशूर भाविक व इंदोर होळकर सरकार यांच्या माध्यमातून सदर मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन फाल्गुन शुद्ध होळी पौर्णिमा च्या दिवशी काशीच्या ब्राह्मणाने द्वारा विधीवत पूजा यज्ञ द्वारे या मंदिरात खंडोबाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

यानिमित्त गावात तीन दिवसीय विविध पूजा मनोरंजनात्मक कार्यक्रमाद्वारे यात्रा आनंद- महोत्सव साजरा करण्यात आला हाच स्थापना दिवस यात्रा महोत्सव म्हणून शहरवासीय आजही करोना काळ वगळता अखंडितपणे साजरा करीत आहेत सदर यात्रा महोत्सव म्हणजे शेती व ग्रामीण भागातील संस्कृती  तसेच जातीय सलोख्याचे एक उत्तम पर्वणीच होय.

पुरातन काळातील काळ्या पाषाणातील खंडोबा मूर्ती भग्न झाल्यानंतर पांढऱ्या शुभ्र संगमरवरी पाषाणाची अश्वारूढ खंडोबा मूर्ती व म्हाळसा देवी, बानूदेवी आदी मुर्त्या तत्कालीन गादीपती आत्मानंद जी महाराज यांना इंदूर राजा नरेश होळकर यांनी ७ डिसेंबर १९४४ रोजी देऊन या मूर्तीची प्रतिष्ठापना फाल्गुन होळी पौर्णिमेला केल्याचा पुरातन शिलालेख मंदिराच्या प्रवेश दारावर ऐतिहासिकची साक्ष देतो तत्कालीन गादीपती तथा फैसपुर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष या देवस्थानाचे शिल्पकार गादीपती महंत घनश्याम दास जी महाराज यांनी या मंदिर मंदिर परिसराचा सन १९९८ मध्ये मोठा जीर्णोद्धार कार्य केले आहे. त्यांच्याच काळात शहरातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गवरील बस स्थानक जवळील व देवस्थानचे भव्यदिव्य महा प्रवेशद्वार ,पाच मंगल कार्यालय बांधण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने सदर देवस्थानाला तीर्थ क्षेत्राचा दर्जा दिला आहे. घनश्याम दास जींच्या देह गमना पश्चात सन २०१९ मध्ये महामंडलेश्वर श्री श्री १००८ पुरुषोत्तम दास जी महाराज यांना सर्वसंमतीने गादीपती विराजमान करण्यात आले आहे. त्यांनी आपले गुरुवर्य घनश्याम दास जी महाराज यांच्या ऐतिहासिक धार्मिक वजनात सेवेचा वारसा सातत्याने पुढे नेण्याचा दृढ संकल्प केला आहे. त्यांच्या अल्प काळात प्रयागराज हरिद्वार येथील कुंभमेळ्यात खंडोबा देवस्थान फैजपूरचा सहभाग नोंदविला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देवस्थानात अत्याधुनिक असे साधू संत निवास साठी निधी मंजूर केला आहे. त्याचे भूमिपूजन सोहळा नुकतेच जिल्हा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, खा. रक्षाताई खडसे, आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.

मंदिर व यात्रा महोत्सवा वर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कोरोना महामारी च्या प्रादुर्भावामुळे सदर यात्रा महोत्सवात दोन वर्षाच्या पडलेला खंड बघता या यात्रा महोत्सवात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात संपूर्ण यात्रा परिसरात, गाडी पार्किंग आदी महत्त्वाच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस द्वारा जागोजागी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून सदर यात्रा महोत्सवात भाविकांनी विशेषता महिलांनी किमती आभूषणे व महागड्या वस्तू सोबत आणू नये, तसेच कोणत्याही अफवांवर शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये दर्शनासाठी किंवा अन्य कामासाठी ढकलाढकली करू नये असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, सपोनि सिद्धेश्वर आखेगावर यांनी केले आहे.

 

Protected Content