फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । शहरातील सहकार क्षेत्रात व राजकीय, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले मसाका संचालक व सातपुडा व लॅक्समी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे यांची खान्देश सन्मान 2021 या पुरस्कारा करिता निवड करण्यात आली आहे.
ही निवड सप्तरंग मराठी चॅनेल यांनी केली असून त्याबाबतचे पत्र नरेंद्र नारखेडे यांना प्राप्त झाले आहे. हा पुरस्कार खान्देशमध्ये सहकार व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारांना दिला जातो. जळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात खान्देशातील मान्यवर व मराठी सिने अभिनेता अभिजित खांडेकर यांच्याहस्ते हा पुरस्कार ३० ऑक्टोबर रोजी दिला जाणार आहे.