खामगाव प्रतिनिधी । 72 वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन समारंभ 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 09.15 वाजता खामगावचे उपविभागीय अधिकारी (महसुल) राजेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 09.15 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगरपरीषद मैदान, खामगांव येथे आयोजीत करण्यात आला. असल्याने सदर दिवशी सकाळी 08.30 ते 10.00 वाजेच्या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये जर एखादया कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 08.30 वा. च्या पूर्वि किंवा 10.00 वा च्या नंतर आयोजित करावा.
कार्यालय अथवा संस्थेने कोरोना संसर्ग सुरक्षेतेचे सर्व नियम पाळून ध्वजारोहन कार्यक्रम करावा. दिवसभरात प्रजासत्ताक दिनानिमित्य वृक्षारोपन, देशभक्ती पर विविध गीत स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन आपआपल्या स्तरावर करण्यात यावे. प्रजासत्ताक दिनाचा साजेसा समारंभ करावा. सदर कार्यक्रमात कोरोना संसर्ग सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात येणार आहे. सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचे प्रामुख्याने कार्यक्रमाचे वेळी पालन सर्वांनी करावे, असे आवाहन खामगांव तहसिलदार, अतुल पाटोळे यांनी केले आहे.