खामगाव अमोल सराफ । स्वातंत्र्य दिनाला शक्यतो विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. तथापि, येथील मिशन ओ-२ ग्रुपतर्फे धुणी-भांडी करणार्या महिलेस हा सन्मान देण्यात आला.
काल सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या अनुषंगाने खामगाव येथील मिशन ०२ या सेवाभावी ग्रुपच्या सदस्यांनी ध्वजारोहणाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या ध्वजारोहण ना चा यावर्षीचा मान एका सामान्य महिला सुचीताताई मोहरील यांना देण्यात आला. सुचीताताई या धुणीभांडी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे या स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला विशेष किनार लाभली होती ।या कार्यक्रमाला मिशन ०२ चे संस्थापक डॉ. कालिदास थानवी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील निवडक नागरिक मिशन ०२ चे सदस्य उपस्थित होते. कोरोना च्या शासकीय नियमावलीचे पालन करून सदर ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी चिताताई मोहरील म्हणाल्या की, मी स्वत: भांडी आणि कपडे धुवून आपले कुटुंब चालवते. यातून वृद्ध सासू आणि मुलांची काळजी घेते. याच कमाईतून आपण दोन मुलींचे विवाह केले आहेत. स्वातंत्र्य दिनाला आपल्याला झेंडा वंदन करण्याचा दिलेला सन्मान हा खूप महत्वाचा असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
खाली पहा याबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.