खामगाव येथील सेंट इंग्लिश स्कूलमध्ये विविध सांस्कृतीक कार्यक्रम

khamgaon news

खामगाव प्रतिनिधी । येथील सेंट अॅन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त ध्वजारोहण व राष्ट्रगीत करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून बीटीएन लाईव्हचे मुख्य कार्यकारी आधिकारी अमोल सराफ, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्ञानसुंदरी, ज्येष्ठ शिक्षिका सुजाता उबाळे, शिक्षिका फातिमा यांच्यासह विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.

 

यामध्ये काश्मीर येथील भारतीय सैन्यावर आधारित सजीव नाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर मुख्य अतिथी अमोल सराफ व शाळेच्या मुख्याध्यापिका ज्ञानसुंदरी यांच्याहस्ते प्रश्नमंजुषा स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

Protected Content