मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बैलपोळा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनीहस्ते बैलांची पुजा करण्यात आली व पुरणपोळीचे नैवैद्य घातले. तर शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येवू दे अशी प्रार्थना केली. याप्रसंगी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे वर्षभर शेतकऱ्यां सोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो. माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी कोथळी येथे बैलपोळ्या निमित्त बैलांचे पुजन करून बैलांना पुरण पोळीचा नैवद्य खाऊ घातला. व शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊं दे अशी प्रार्थना केली.
यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या शेतकरी बांधव आपल्या शेतात राबून काळ्या आईची सेवा करून धान्य पिकवत असतात, त्यांना या कार्यात बैलांची मोलाची साथ लाभते. वर्षभर शेतात राबून घेत असलेल्या मेहनतीबद्दल वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैल पोळा. हा दिवस भुतदयेची सुध्दा शिकवण देतो.
दरवर्षी आम्ही कोथळी येथे वृषभ राजाचे पुजन करतो सालाबाद प्रमाणे यावर्षी सुध्दा वृषभ राजाचे पुजन करून त्यास पुरण पोळीचा नैवद्य खाऊ घातला व पिक पाणी व्यवस्थित होऊन शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊं दे अशी वृषभ राजा कडे प्रार्थना केल्याचे ॲड.रोहिणी खडसे यांनी सांगितले.