खडसेंना देण्यासाठी शिवसेनेकडे आहे तरी काय ? -चंद्रकांत पाटील

chandrakant patil

पुणे प्रतिनिधी । खडसेंना देण्यासाठी शिवसेनेकडे आहे तरी काय ? अशी बोचरी टीका करून माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊ हे पक्षत्याग करणार नसल्याचे सांगितले आहे.

सध्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नाराजीवरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्‍वभूमिवर, माजी महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.  ते म्हणाले की, खडसेंना देण्यासाठी शिवसेनेकडे आहे तरी काय ? भाजपला पराभूत करण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले तरी आम्ही सांगली आणि सोलापूरच्या जिल्हा परिषदांमध्ये विजय मिळवला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Protected Content