मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील शिक्षणपूरक उपक्रम समिती अंतर्गत “मानवी हक्क” या विषयावर प्रा.डी.आर.कोळी (इतिहास विभाग) यांचे व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी.एन. बावस्कर होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,सकल मानव समाजाने एकमेकांचा आदर, सन्मान करायला शिकले पाहिजे यातून सहज मानवी हक्कांचे संरक्षण होण्यास मदत होईल. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डी.आर. कोळी यांनी मानवी हक्कांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वाकायला शिकले पाहिजे. यातच मानव कल्याण आहे आणि मानवी हक्कांचे संरक्षण. या भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक मानवाला निसर्गतः मानवी हक्क प्राप्त होतात; तेव्हा त्यास ते मानवी हक्क उपभोगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक शासन यंत्रणेने दिले पाहिजे असे ते म्हणाले. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.गणेश चव्हाण (इंग्रजी विभाग) यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.