मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयात इतिहास विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आंतरविद्याशाखीय व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉक्टर एच.ए. महाजन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी प्राचीन काळातील भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक पेटंट विषयी मार्गदर्शन करून विज्ञानवादी व्हा असा मौलिक संदेश दिला. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.बालाजी बालाजी तोटावार यांनी “प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयावर मार्गदर्शन करताना प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विशद केले.
तसेच प्रत्येक सजीवाचे जीवसृष्टीच्या रुपाने विज्ञानाशी एक घट्ट नाते जोडलेले आहे आणि म्हणून प्रत्येक भारतीयांनी प्राचीन विज्ञान व तंत्रज्ञान हा भारतीय संस्कृतीने दिलेल्या समृद्ध वारसा जपला पाहिजे.असे मौलिक विचार मांडले. प्रस्तुत कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर ए. पी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. पी. एस. प्रेमसागर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डी.आर.कोळी यांनी केले व अशपाक तडवी याने आभार मानले. कार्यक्रमाला प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर.टी. चौधरी यांनी सहकार्य केले.प्रस्तुत कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक ,प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.