Home Cities जळगाव कालाय तस्मै नम:….खडसेंचे हताश उदगार !

कालाय तस्मै नम:….खडसेंचे हताश उदगार !


aa. khadase

जळगाव, प्रतिनिधी | भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असुन त्यामध्ये जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव आलेले नाही. गेल्या सहा वेळेपासून भाजपातर्फे मुक्ताईनगरातून निवडून येणारे आ. खडसे या घटनेने कमालीचे निराश झाले असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपले नाव पुढल्या यादीत नक्की असेल, असा आशावाद व्यक्त करीत ”कालाय तस्मै नम:” असे हताश उदगार काढले आहेत.

 

आ. खडसे यांनी आज सकाळी कोथळी येथुन वाजत-गाजत मिरवणुकीने जावून तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षाशी प्रामाणिक राहणे, हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे. पत्रकारांनी खडसे यांना विचारले की, पुर्वी आपण तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये असायचे. आज तुमचे नाव आहे की नाही ते ही तुम्हाला माहित नाही ? तेव्हा ते म्हणाले की, आज मुहूर्त चांगला असल्यामुळे मी माझा अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी आज यादीमध्ये नाव आहे की नाही, याची वाट बघितली नाही. आणखी एक यादी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी माझा अर्ज भरलेला आहे आणि यादीची वाट पाहतो आहे. त्याबद्दल मी वरिष्ठांशीही बोलणार आहे, असे सांगून ते मेळाव्याला निघुन गेले.


Protected Content

Play sound