जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता रिंगरोडवरील मुख्य इमारतीत घेण्यात आली. सर्वसाधारण सभेत ताळेबंद मांडून खर्च मान्यतेसह विविध विषयांना सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थीत सभासदांनी विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून संचालक मंडळाला धारेवर धरल्याने सभेत खडाजंगी उडाल्याचे दिसून आले.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन संजय पवार, उपाध्यक्ष अमोल पाटील, आमदार चिमणराव पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, माजी मंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री सतिष पाटील, रविंद्रभैय्या पाटील यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि सभासद यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सभेच्या सुरूवातील बँकेतील मृत झालेल्या सभासद श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चेअरमन संजय पवार यांनी बँकेने गेल्या वर्षभरात केलेले कर्जवाटप आणि येणाऱ्या वर्षातील उद्दीष्टे यांची माहिती संचालक मंडळ व सभासद यांच्या समोर मांडला. आर्थीक वर्षात बँकेला ७१ कोटी ६७ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. तर बँकेच्या व्यावसायत गत वर्षाच्या तुलनेत ३२५ कोटींची वाढ झाल्याचे सांगत, गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास ९५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले असून पुढील वर्षी अकराशे कोटींचे कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्टे आहेत अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन यांनी दिली. यावेळी सर्वसाधारण सभेत ताळेबंद मांडून खर्च मान्यतेसह विविध विषयांना मंजूरी देण्यात आली.
यावेळी उपस्थीत सभासदांनी विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून धारेवर धरल्याने सभेत खडाजंगी उडाल्याचे दिसून आले. आजच्या सभेत मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेधाचा ठराव करण्याची मागणी एका शेतकऱ्याने व्यासपीठावरील अध्यक्ष संचालकांकडे केली. यावरून निषेधाचा ठराव करण्याची मागणी करत संतप्त शेतकऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो उचलून एका हातात उचलून घेतल्याने गोंधळ उडाल्याचे दिसून आले. यावेळी शेतकऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हातात उचलल्याने व्यासपीठावर बसलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी संताप व्यक्त केल्याचे पहायला मिळाले.