दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आम आदमी पक्षाच्या राजसभा खासदार स्वाती मालीवाल प्रकरणी दिल्ली पोलीसांनी अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक केली आहे. विभव कुमार यांना केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली आहे. विभव कुमार यांचे नाव दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये असून चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्वाती मालीवाल यांचं म्हणणं आहे की, जेव्हा त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचल्या त्यावेळी त्यांच्यासोबत विभव कुमार यांनी गैरवर्तन केले आणि त्यांच्यासोबत मारहाणही करण्यात आली होती. स्वाती मालीवाल यांच्या तक्रारींच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरनंतर एम्समध्ये स्वाती मालीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्या रिपोर्टमध्ये हेदेखील सांगण्यात आलं आहे की, स्वाती डाव्या पायावर आणि उजव्या डोळ्याखाली जखमेच्या खुणा आहेत. स्वातीनं डोकेदुखी आणि मान ताठ असण्याचीही तक्रार केली आहे.
स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन आणि मारहाणप्रकरणी केजरीवालांच्या पीएला अटक
7 months ago
No Comments