केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या खेळाडूची राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेकरिता निवड

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पंजाब राज्यातील लुधियाना येथे ११ ते १४ मार्च दरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेकरिता केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या खेळाडू कु. आकाश धनगर यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करत कु. आकाश धनगर यानी सिल्वर मेडल प्राप्त केले होते. राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत तुंगल, रेगु, गंडा, ट्याडिंग चार प्रकारात पार पडत आहे. पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट चा प्रकार असून स्वसंरक्षणाच्या दृष्टीने सर्वात प्रभावी मार्शल आर्ट आहे.

आकाश धनगर याचा महाविद्यालयाच्या वतीने बुके व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक राणे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, विभागप्रमुख प्रा.निलेश जोशी, प्रा.प्रविण कोल्हे, प्रा.पंकज पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content