Home Cities जळगाव प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे यांचा राजीनामा

प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे यांचा राजीनामा

0
36

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. आर. एल. शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सध्या प्रभारी राज सुरू आहे. मात्र विविध महत्वाच्या पदांचा प्रभार मिळालेले मान्यवर हे एकामागून एक या प्रकारात आपापल्या पदांचा राजीनामा देत आहेत. यात आता विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. आर. एल. शिंदे यांची भर पडली असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा कुलगुरुंकडे दिला आहे.

याआधी प्रा. भादलीकर यांच्यानंतर प्रा. ए, बी. चौधरी यांच्याकडे कुलसचिवपद देण्यात आले. मात्र, काही दिवसातच त्यांनीही राजीनामा दिला. यानंतर पुन्हा डॉ. भादलीकर यांना पदभार देण्यात आला पण पुन्हा कर्मचार्‍यांनी विरोध केल्याने त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर स्टॅटीस्टीक्स ऍक्चुरिअल सायन्स विभागाचे प्रा. डॉ. आर. एल. शिंदे यांच्याकडे पदभार देण्यात आला. मात्र त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले आहे.


Protected Content

Play sound