जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षांना आजपासून प्रारंभ होत आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१मधील पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या द्वितीय सत्रातील लेखी परीक्षांना आजपासून प्रारंभ होत आहे. परीक्षादरम्यान वीजपुरवठा खंडीत झाल्यास अथवा तांत्रिक दोष निर्माण झाल्यास विद्यार्थांनी घाबरून न जाता विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपात घेतल्या जाणार आहेत.
या परिक्षांमध्ये पदवी स्तरावरील परीक्षेसाठी ९० मिनिटे व पदव्युत्तर स्तरावरील १२० मिनिटे असा कालावधी राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन परीक्षेच्या नियमावलीची माहिती परिपत्रकाद्वारे विद्यापीठाने प्रत्येक परीक्षार्थीस दिली आहे.