जामनेर प्रतिनिधी । राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवेतील सचिव ते शिपाई पदापर्यतंच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठीचे लेखी पत्र देण्यात देण्यात आले असून आज जामनेर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देवून १३ पासून बेदमुत संपावर जाणार असल्याचे प्रशासनास कळविण्यात आले आहे.
मुंबई येथे आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य कृउबा आणि मराठा ठोक मोर्चाच्या वतीने 29 ते 31 जुलै 2019 पर्यंत आंदोलन करण्यात होते. मात्र शासन स्तरावर आंदोलनाबाबात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने वरील विषयाला अनुसरून जिल्ह्यातील बाजार समित्यांनी ७ व ८ ऑगस्टलाही लाक्षणिक बंद पाळला. तरी मागण्या मान्य होत नसल्याने १३ ऑगस्ट पासून जामनेर बाजार समितीचे सर्व कर्मचारी समिती बंद ठेवून बेमुदत संपावर जाणार आहे. यामुळे कोणतीही समस्या निर्माण झाल्यास शासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रसाद पाटील, संजय लोखंडे, राजेंद्र बिऱ्हाडे, चंद्रशेखर पाटील, संजय सुरवाडे, मनोज बागमार, प्रशांत जोशी, बजरंग परदेशी, किशोर पाटील, नितीन झाल्टे, बद्री राठोड, एकनाथ पाटील, संदीप सुरवाडे, वंदनाबाई पाटील, गणेश तेली, सुरज धुमाळ यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहे.