भारत विकास परिषदेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत विकास परिषद आणि जळगाव इंटेरिअर डिझायनर्स असोसिएशन यांच्या संयुक्तविद्यामानाने शहरातील काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानाजवळ खुले रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होता. या शिबीरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

राज्यात सध्या १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यास सुरूवात झाली आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यावर काही दिवस रक्तदान करता येणार नाही. आत्ताच रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. १८ वर्षांवरील तरूण व तरूणींनी लस घेतली खूप मोठी लोकसंख्या इच्छा असून रक्तदान करू शकणार नाही ही पार्श्वभूमी लक्षात घेवून  भारत विकास परिषद आणि जळगाव इंटेरिअर डिझायनर्स असोसिएशन यांच्या संयुक्तविद्यामानाने शहरातील काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानाजवळ आज रविवारी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान खुले रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले. या शिबीरात ४० जणांनी रक्तदान केले. 

रक्त संकलनासाठी माधवराव गोळवलकर रक्तपेढी जळगांव  ह्यांचे सहकार्य लाभले.  उपक्रम यशस्वीतेसाठी भारत विकास परिषदेचे प्रकल्प प्रमुख उमेश पाटील आणि जळगाव इंटेरिअर डिझायनर्स असोसिएशनचे सचिन कापडे यांनी पुढाकार घेतला. भारत विकास परिषदेचे शाखा प्रमुख उज्वल चौधरी, देवगिरी प्रांत अध्यक्ष तुषार तोतला, जळगाव शाखा सचिव डॉ योगेश पाटील, गिरीश शिंदे, प्रशांत महाजन, प्रसन्न मांडे, अरुण जोशी, राजीव नारखेडे, धनंजय खडके, रविंद्र  लड्ढा, संजीव पाटील, ओंकार कुलकर्णी, सचिन चोरडिया, मुकेश सुराणा, अनिता नारखेडे, सीमा महाजन, विद्या सराफ-चौधरी,  डिझायनर्स असोसिएशन अध्यक्ष राजेश शर्मा, यतीन महाजन उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/294357265463317

 

Protected Content