जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होणाऱ्या त्रिवेणी व्यवसाय शिखर परिषदेच्या पूर्वतयारीसाठी शनिवार 21 डिसेंबर रोजी शहरातील उद्योजक, व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजन करण्यात आली आहे.
विद्यापीठ आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात 11 व 12 जानेवारी रोजी त्रिवेणी व्यवसाय शिखर परिषद होणार आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील उद्योजक, कारखानदार, इंजीनियर्स टेक्नोकॅट म्ॉनेजमेंट कन्सल्टन्ट, बँकर्स, विविध ब्ॉकिंग संस्था, टॅक्सेशन ऑथॉरिटी आणि चार्टर्ड अकाऊंटंट, सरकारी एजन्सीजचे प्रतिनिधी, तरुण उद्योजक विद्यार्थी आणि ट्रेड इंडस्ट्रीज असोसिएशनसह संपूर्ण महाराष्ट्रातून साधारणपणे चारशे ते पाचशे उद्योजक सहभाग होतील. तेवढयाच विद्याथ्र्यांना सुध्दा भाग घेण्याची संधी मिळणार आहे. यातून उद्योजक आणि विद्यार्थी शिक्षक यांच्यात चर्चा घडून येईल आणि नोकरीच्या किंवा उद्योगाच्या अधिकाधिक संधी युवकांना उपलब्ध होतील. या अभिनव उपक्रमाच्या उदघाटनासाठी देशाचे केंद्रीय भुपृष्ठ परिवहन आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.
या शिखर परिषदेच्या पूर्वतयारीसाठी शनिवार 21 डिसेबर 2019 रोजी हॉटेल सिल्वर प्ॉलेस येथे संध्याकाळी 7:30 वाजता विविध व्यावसायीक संघटनांचे पदाधिकारी यांची एक संवाद बौठक आयोजित करण्यात आली आहे. या बौठकीस संबंधित संघटनांचे पदाधिकारी / उद्योजकांनी उपस्थितीत राहून सदर शिखर परिषदेच्या यशस्वीतेसाठी मार्गदशक सूचना कराव्यात. या पूर्वतयारीच्या बौठकीसाठी जे उद्योजक सहभागी होऊ इच्छितात त्यांनी अधिक माहितीसाठी डॉ.भुषण चौधरी (9823452539) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.