कात्रज-कोंढवा चौकातील पाईपलाईन फुटली

pune 2

पुणे प्रतिनिधी । कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असतांना मोठी जलवाहिनी आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कात्रजकडून आल्यानंतर असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ जेसीबीच्या साहाय्याने खोदाईचे काम सुरू आहे. दरम्यान, या खोदाईचे काम होत असतांना भूमिगत जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यावेळी जलवाहिनीमधून पाण्याचे मोठे फवारे उडत होते की, लांबवरून हे दृश्य पाहण्यास मिळाले. या घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठा विभागाचे अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली असून जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद करण्यात येवून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

Protected Content