जळगाव प्रतिनिधी । कांचन नगर परिसरात आज सकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
जुन्या भांडणाच्या वादातून गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये माजी उपमहापौर अशोक सपकाळे याचा मुलगा राकेश सपकाळे यांचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात आकाश सपकाळेसह इतरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याना जामीन मंजूर केला होता. भावाचा खूनाचा बदला घेण्यासाठी मयत राकेशचा भाऊ बाबू आणि बंटी सपकाळे यांनी विक्की अलोणे याला आकाश सपकाळे याला ठार मारण्याची सुपारी दिली. त्यानुसार आज गुरूवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता आकाश सपकाळे हा कांचन नगरात राहत्या घरात असतांना विक्की अलोणे, मिलींद सकट, बंटी महाले आणि राहूल (सुपड्या) भालेराव हे रिक्षाने आकाशच्या घराजवळ आले. त्यावेळी विक्की आणि मिलींद यांनी आकाशच्या घरात शिरून आकाशवर गोळीबार केली. यात आकाशच्या हाताला गोळी लागल्याने किरकोळ जखमी झाला होत. गोळीबारचा आवाज झाल्यानंतर आकाश सपकाळेचे वडील मुरलीधर सपकाळे आणि भाऊ नितीन सपकाळे यांनी विक्कीला मागुन घट्ट पकडले. मिलींदनेही एक फायरिंग केली तर विक्कीने घरात तीन फायरिग केल्यात. यात आकाश थोडक्यात बचावला. त्यानंतर मिलींद हा घरातून बाहेर पडला. तर विक्की हा घराबाहेर जात असतांना तो घराच्या पायरीवरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्ला झाल्यानंतर आकाश सपकाळे, नितीन सपकाळे, मुरलीधर सपकाळे आणि रूपेश सपकाळे यानी विक्की याला मारहाण करून जखमी केले आणि बेशुध्द झाला. हे पाहून सोबत आलेले तिघे सहकारी मिलींद, बंटी आणि राहूल हे रिक्षाने पळ काढला. थोड्याच वेळा पोलीस घटनास्थळी आले. जखमी झालेल्या विक्कीस तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
पोलीस पंचनामा झाल्यानंतर शनीपेठ पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रेफिरवत फरात असलेल्या तीनही फरार झालेल्या तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान सायंकाळी उशीरापर्यंत परस्परविरोधात १० जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
संशयितांना अटक करण्यात पोलीसांना यश
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे, पोउनि सुरेश सपकाळे, पोहेकॉ परिष जाधव, पो.ना. किरण वानखेडे, अनिल कांबळे, राहूल पाटील, राहूल घेटे आदी अधिकारी व पोलीस कर्मचारी या पथकाने फरार झालेले तीन संशयित आरोपी काही तासात ताब्यात घेतले आहे.