एलआयसी सामाजिक बांधिलकी जोपासते – शाखाधिकारी सोलंकी
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेच्या वतीने अमळनेर तालुक्यातील कळमसरे गाव विमा ग्राम म्हणून घोषित करण्यात आले. याबाबत शाखाधिकारी गोपाल सोलंकी उपशाखाधिकारी सुमितकुमार, विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत यांना अमळनेर एल आय सी तर्फे पंच्यात्तर हजार रुपयाचा धनादेश गावाचा विकास कामासाठी देण्यात आला.
विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी या आर्थिक वर्षात गावातील ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात विमा कवच देऊन सुरक्षित केले. त्याबद्दल बक्षिस म्हणून येथील ग्रामपंचायतीला ७५ हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी सोलंकी म्हणाले, एलआयसी ही सामाजिक बांधिलकी जोपासते. म्हणूनच अमळनेर येथील गतीमंद व मूकबधीर विद्यालयाला मुलांना ये जा करण्यासाठी सुमारे २५ लाखाची गाडी भेट दिली आहे. उपशाखाधिकारी सुमित कुमार यांनी कळमसरे ग्राम विमा ग्राम घोषित करण्यामागे विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी मेहनत घेत ग्रामस्थांना सुरक्षित असे विमा कवच देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. व त्यांनी विम्याचे महत्व पटवून दिले.
याप्रसंगी विकास सोसायटीचे चेअरमन रमेश चिंधा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य दिनकर चव्हाण, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, पाडळसरे येथील रविंद्र पांडुरंग पाटील, सचिन योगराज पाटील,अशोक तुळशीराम चौधरी, अरुण पांडुरंग चौधरी, झूलाल भबुता चौधरी, धमेंद्र रणजितसिंग राजपूत, नगराज शांताराम चौधरी, रामलाल गोरख पाटील, सीताराम तुकाराम चौधरी, सुनील अंकुश पाटील, योगेंद्र सुकलाल चौधरी, योगेश हिलाल पाटील, नारायण गुलाब पाटील, शरद अशोक चौधरी, प्रदीप गुलाब पाटील, किशोर पांडुरंग चौधरी, पोलीस पाटील गोपाल हिरामण पाटील, स्वप्नील मधुकर माळी, गजानन रोहिदास पाटील, योगेंद्रसिंग दर्यावसिंग राजपूत, मधुकर पाटील,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.