जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी कैलास चौधरी बिनविरोध (व्हीडीओ)

5864bdf2 75e9 464c a7be b7916e879f55

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी कैलास चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री.चौधरी हे शिवसेना समर्थक असून आज सकाळी त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

 

बाजार समितीत सुरवातीला भाजप समर्थक प्रकाश नारखेडे यांना सभापतिपदाची संधी मिळाली होती. त्यांनी पायउतार केल्यानंतर स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडून लढविणारे लक्ष्मण पाटील यांना सभापतिपदाची संधी मिळाली. सुमारे दीड वर्षे ते सभापती होते. आता शिवसेना समर्थकांना सभापतिपद मिळेल, असे सांगितले जात होते. त्यामुळे शिवसेना नेते सुरेश जैन यांचे निकटवर्तीय कैलास चौधरी यांचे नाव आघाडीवर होते. तर दुसरीकडे सभापती निवडीपूर्वी काही संचालक सहलीला गेल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. परंतु सभापती निवडीसाठी आज २७ रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात विशेष सभा झाली आणि त्यात कैलास चौधरी यांची बिनविरोध झाली. यावेळी सहायक निबंधक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघितले.

 

 

 

Add Comment

Protected Content