Home Cities चोपडा कचऱ्‍यातून कलानिर्मिती रोजगाराचे उत्तम साधन – शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले

कचऱ्‍यातून कलानिर्मिती रोजगाराचे उत्तम साधन – शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले


chopda news 3

चोपडा प्रतिनिधी । “कचऱ्यातून कलानिर्मिती रोजगाराचे उत्तम साधन होऊ शकते. याकडे विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने बघितले पाहिजे”. असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी केले. येथील भगिनी मंडळ संचलित, ललित कला केंद्र या उच्च कलाशिक्षण देणाऱ्या संस्थेत ज्येष्ठ कलाशिक्षक सुनील पाटील यांच्या “कचऱ्यातून कलानिर्मिती” प्रदर्शनाचे उद्घाटन भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी यांच्याहस्ते पार पाडले. त्‍याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. भोसले बोलत होते.

मनोगतात “कचऱ्यातून कलानिर्मिती रोजगाराचे उत्तम साधन होऊ शकते. याकडे विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने बघितले पाहिजे”. त्या म्हणाल्या “उपक्रमशील, व्यासंगी कलेचा वारसा श्री.पाटील यांना स्वर्गीय कलाशिक्षक प्रताप पाटील यांच्या अनुवंशाने मिळाला. तो अधिक चांगल्या पद्धतीने ते पुढे नेत आहेत.” असा त्यांनी गौरव केला. कलाशिक्षक सुनील पाटील यांचा शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी यांनी केला.

६०वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन विद्यार्थी कला शिक्षण प्रशिक्षण विभागातून ७५००/- रुपये द्वितीय पुरस्कार प्राप्त निखिल छन्नू कोळी रा. बोरजअँटी याचा सत्कार शिक्षण अधिकारी महोदयांनी केला. यावेळी सत्कारार्थी व प्रात्यक्षिक सादर केलेल्या कलाशिक्षक श्री.सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतात, “कोणत्याही कचऱ्यातून मला कलात्मक घटक दिसतात. आपल्याजवळ फक्त कलात्मक दृष्टी हवी आणि मेहनत करण्याची तयारी हवी. “कलावंतच समाजाला कलात्मकतेची नजर देत असतो. याद्वारा व्यवसायाभिमुख रोजगारही उपलब्ध होऊ शकतो” असे महत्त्वाचे मार्गदर्शन केले. येथे मांडलेल्या प्रदर्शनात शंभरपेक्षा जास्त लहान-मोठ्या वस्तू मांडलेल्या आहेत. पेनस्टॅण्ड, टेबल लॅम्प, कुंकवाचे करंडे, शॉप सुपारी चे भांडे, फोटो फ्रेम्स अशा गृहउपयोगी सजावटही वस्तूंचा समावेश आहे. यासाठी कचऱ्यातील नारळाच्या करवंट्या, स्लाइडिंग विंडोचे मटेरियल, सुतळी रील, जाहिरातींची पत्रके, काचेच्या बाटल्या, रंगीबेरंगी दगड, काड्या, फर्निचर मधून उरलेली तुकडे इत्यादींचा वापर केलेला आहे.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर गजरे, शिक्षक समन्वयक युवराज पाटील, मुख्याध्यापक एस.डी. चौधरी, बाहुली नृत्यकार प्राध्यापक दिनेश साळुंखे, संजय बारी, कला शिक्षक अमोल कोळी मुंबई, तसेच फाउंडेशन ए.टी.डी. व जीडी आर्टचे विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय नेवे तर फलक लेखन प्राध्यापक सुनील बारी, आभार प्रदर्शन प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपक्रम प्रमुख प्राध्यापक विनोद पाटील, प्राध्यापक जी.व्ही.साळी,लिपीक,भगवान बारी सेवक अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी यांनी प्रयत्न केले.


Protected Content

Play sound