जळगाव प्रतिनिधी । येथील के. के. ऊदू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज (दि.28) प्रख्यात ऊर्दू साहित्यकार गझल सम्राट मिर्झा असदुललाह खान गालीब यांची 222 वी जयंती प्राचार्या शमीम मलिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी आपल्या भाषणात त्यांनी ऊर्दू भाषेत गझल शैलीचे महत्व व गझल शैलीत मिर्झा गालीबचे योगदान विषयी मार्गदर्शन करताना वाचन संस्कृती जोपासण्याविषयी सूचना देऊन क्रमिकपुस्तका बरोबर अवांतर वाचन करण्याचे सांगितले. वाचन संस्कृतीला वाव मिळावे व विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकांचे हस्ते ऊर्दू शैक्षणिक साप्ताहिक पत्रिका भेट म्हणुन देण्यात आली. अकिल खान बियावली, मोहसीन शाह, शेख तबरेज ह्या शिक्षक वृदांनी मिर्झा गालीब यांच्या जिवनावरील माहिती दिली. यशस्वीतेसाठी मझहरोदीन शेख, मुश्ताक भिसती, नाजिया शेख, जमीला शेख, यांच्या समवेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.