भडगाव प्रतिनिधी । तालुक्यात जुवार्डी येथील पाझर तलाव क्रमांक 3 चे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी वन विभागाचे 81 लाख व कामासाठी 90 लाख रूपये त्यांनी मंजुर केल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी रखडलेल्या जुवार्डीच्या पाझर तलावाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या पाठपुराव्यासंदर्भात माहीती दिली.
आमदारांनी शब्द खरा करून दाखवला
जुवार्डी ( ता. भडगाव) येथे वनक्षेत्रातील पांझर तालाव क्र. 3 चे काम 1980 ला शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले. 1985-86 मधे पाझर तलावाचे काम बंद करण्यात आले. सदर तलावाचे काम 90 टक्के झाले आहे. त्यानंतर तलावाचे राहीलेले काम पुर्ण करण्यासाठी ग्रामस्थांकडुन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. उपवनसंरक्षक यांनी सप्टेंबर 2016 ला वनविभागाची 13 हेक्टर जमीन पाझर तलावासाठी वर्ग करण्यासाठी भूसंपादन निधी 81.31 लक्ष ची मागणी लघुसिंचन विभागाकडे केली. त्यानंतर आमदार कीशोर पाटील यांच्यासहाय्याने लोकप्रतीनीधिनी व ग्रामस्थांनी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा केला.
ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत मृद व जलसंधारण विभागाने लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंताकडे दोन पत्रान्वये निधी मागणी प्रस्ताव मागविला आहे. मात्र 33 वर्षांपासुन रखडलेले काम शासनाच्या लालफीतीतुन बाहेर निघायला तयार नव्हते. अखेर 19 फेब्रुवारी शिवजयंतीले ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन प्रश्न मार्गी लागेपर्यंत गावातच सामुहीकरित्या उपोषण करण्याचा एकमताने निर्णय घेतला . ग्रामस्थांनी सलग तिन दिवस उपोषण केले. आमदार किशोर पाटील यांनी उपोषणाला भेट दिली. त्यावेळी “जोपर्यंत हे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत मी गावात पाय ठेवणार नाही” असे आश्वासन ग्रामस्थांना देऊन त्यांनी उपोषण सोडले. पुढच्या सहा महीन्यानंतर त्यांनी या प्रश्नात सातत्याने प्रयत्न केला. अखेर त्या कामाचा प्रश्न निकाली काढत त्यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द खरा करून दाखवला.
1 कोटी 70 लाखांचा निधी मिळाला
आमदार कीशोर पाटील यांनी पाझर तलावात जाणार्या वन जमीनीच्या मोबदलापोटी वन विमागाला 81 लाख 38 हजाराचा निधी जिल्हा नियोजन विभागाकडुन उपलब्ध करून घेतला. तर पाझर तलावाच्या दुरूस्तीसाठी लागणारा 90 लाखाचा निधी त्यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत मिळवला. याकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच याकामाला प्रत्यक्ष सुरवात होत आहे. या कामासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जिल्हा नियोजन अधिकारी पी.के.पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले.
जुवार्डीचा पाण्याचा प्रश्न सुटेल
दरम्यान रखडलेल्या पाझर तलाव च्या काम पुर्णत्वास आल्यानंतर जुवार्डी गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. शिवाय जंगलातील वन्य प्राण्यांचा पाण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे. त्यामुळे हे काम मंजुर करण्याचे मोठे समाधान असल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले. यावेळी सभापती रामकृष्ण पाटील, उपसभापती प्रताप सोनवणे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विकास पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रा. गणेश पाटील, नगरसेवक डॉ.प्रमोद पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे.के.पाटील, सहकार सेलचे तालुकाप्रमुख प्रमुख युवराज पाटील, शिवशक्ती-भिमशक्तीचे तालुकाप्रमुख राजेंद्र मोरे, जगन भोई, बापु पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.
– कोट
ग्रामस्थांना दिलेला शब्द खरा करून दाखवल्याचे आभाळा एवढे समाधान आहे. जुवार्डी पाझर तलावाचा 40 वर्षापासून प्रश्न रखडलेला होता. तो प्रश्न निकाली काढण्यास यश आले आहे. याशिवाय 132 के.व्ही.वीज सबस्टेशनचा रखडलेला प्रश्न सोडविल्याचा आनंद आहे.
– किशोर पाटील, आमदार पाचोरा