Home आरोग्य जुनोनेत आय.सी.आय तर्फे मोफत नेत्र तपासणी 

जुनोनेत आय.सी.आय तर्फे मोफत नेत्र तपासणी 

0
36

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील जुनोने येथे आय. सी. आय फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी एकूण ३६० जणांनी तपासणी करून घेतली.

तालुक्यातील जुनोने गावात आय. सी. आय. सी. आय फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणीबाबत गुरूवार, १२ रोजी शिबिर घेण्यात आले. सदर शिबिराचा लाभ एकूण ३६० जणांनी घेतला. त्यापैकी १९० जणांना तपासणीतून दृष्टीची समस्या असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांना मोफत चष्मा वितरीत करण्यात आले. चाळीसगाव कृषी विभागाचे कृषी सहायक तुफान खोत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी आय.सी.आय कडून जिल्हा विकास अधिकारी गणेश बोरगे, प्रविण भांडारे हे उपस्थित होते. त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच गोरख राठोड, उपसरपंच संजय मोरे, ग्रामपंचायत सदस्य विकास राठोड, मधुकर मोरे, ज्ञानेश्वर पाटील, विजय वाणी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी सदर शिबिर गावात राबविल्या बद्दल सरपंच गोरख राठोड यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानले आहेत.

 


Protected Content

Play sound