जळगाव (प्रतिनिधी) पंजाब येथे होणाऱ्या ज्युनियर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या मुले मुली संघाचे सराव शिबीर जळगाव येथे सुरू असून संघातील खेळाडूंना आज ट्रॅक सूट, कीटचे वाटप करण्यात आले.
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, महानगरपालिका क्रीडा अधिकारी विवेक आळवणी, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवलकर यांच्या हस्ते ट्रॅकसूट व किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. चौधरी, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, कार्याध्यक्ष प्रा. इक्बाल मिर्झा, सहसचिव विजय रोकडे, खजिनदार सचिन महाजन, सराव शिबीर प्रमुख प्रा. वसीम मिर्झा, आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू विराज कावडिया, आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू उमाकांत जाधव, युवाशक्ती फाऊंडेशनचे सचिव अमित जगताप, जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख मनोज वाघ यांची उपस्थिती होती. राज्याचे संघाच्या संघव्यवस्थापक म्हणून प्रा अतुल पडोळे (अमरावती), आंतरराष्ट्रीय खेळाडू नीरज ओक (जळगाव), संघप्रशिक्षक नौशाद शेख(सातारा), अंकिता गढदे (लातूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.