जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मंत्रीमंडळाच्या बैठकीत समस्त शिंपी समाजासाठी संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. त्याचे औचित्य साधून आज जळगाव येथे अ भा क्षत्रिय नामदेव महासंघ हितवर्धक संस्था जळगाव व शहरातील सर्व सहयोगी संस्थेच्या वतीने ११ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप सामाजिक सभागृह येथे जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे पूजन व माल्यार्पण समाज अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे यांनी केले व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच समाज बांधवांना पेढे भरून वाटप केले. यावेही व संत नामदेव महाराजांचा जय घोषणा देण्यात आले.
याप्रसंगी समाजध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, राज्य महिला संघटक कुसुम बिरारी, सविता बोरसे सुरेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रमोद शिंपी, संस्था पदाधिकारी अनिल खैरनार, चेतन खैरनार, शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, शरदराव बिरारी, अशोक सोनवणे, सतिष जगताप, दत्तात्रय वारूळे, किरण सोनवणे, गणेश सोनवणे, भुषण सोनवणे, विकास जगताप, ऋषिकेश शिंपी, दत्तात्रय कापुरे, शैलेंद्र सोनवणे, चेतन नेरपगार, केतन मेटकर, शरद कापुरे, उमेश शिंपी, राहुल शिंपी, प्रमोद निकुंभ, दिनेश खैरनार, विक्की जगताप, बापू खैरनार, यांच्यासह असंख्य समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येसह उपस्थित होते.