Home क्राईम चाळीसगावात पत्रकाराचा महागडा मोबाईल धूम स्टाईल लांबविला

चाळीसगावात पत्रकाराचा महागडा मोबाईल धूम स्टाईल लांबविला


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव मुख्य वर्दळीच्या स्टेशन रोड परिसरात एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावून दोन दुचाकीस्वार चोरटे पसार झाले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र तुकाराम सूर्यवंशी (वय ४६, रा. राजपूत नगर, चाळीसगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते व्यवसायाने पत्रकार आहेत, ९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपले काम आटोपून स्टेशन रोडवरून जात होते. ‘डिजिटल प्रेस मीडिया’ कार्यालयासमोरून पायी जात असताना, मागून एका काळ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलवर दोन अज्ञात तरुण आले. काही समजण्याच्या आतच दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने सुर्यवंशी यांच्या हातातील १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. या संदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक नितीन साहेबराव अगोणे करत आहे.


Protected Content

Play sound