सावदा, ता. रावेर । येथून जवळच असलेल्या वाघोदा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पत्रकार मुबारक तडवी यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र केले होते. या पार्श्वभूमिवर, आज सरपंच निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. यात सरपंचपदासाठी मुबारक अली तडवी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. यामुळे त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीप्रसंगी खिरोदा येथील मंडळ अधिकारी संदीप जैस्वाल यांनी कामकाज पाहिले.
दरम्यान, सरपंचपदी निवड झाल्यानंतर मुबारक तडवी यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील महापुरूषांच्या प्रतिमांना वंदन करून कामकाजास प्रारंभ केला. याप्रसंगी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधतांना आपण सर्वांच्या सहकार्याने गावाच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे नमूद केले.