जळगाव प्रतिनिधी । मुळजी जेठा महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षणशास्त्र आणि शारीरिकशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अशोक राणे यांनी प्रतिमापूजन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी माहिती देत पत्रकारितेत होत असलेले बदल आव्हानात्मक असून यात विद्यार्थ्यांना करिअरची मोठी संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमास जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.संदीप केदार, ज्ञानजगत डिजिटल पोर्टलचे असिस्टन उमेश दंडगव्हाळ, टेक्निकल असिस्टन तुषार भामरे, फोटोग्राफर संजय जुमनाके, मोहन चौधरी, केतन पाटील, प्रवीण कोल्हे, केतन पाटील, विजय चव्हान यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.