उंटावद येथे दुध उत्पादक सोसायटी व ‘एन.डी.डी.बी.’ची संयुक्त बैठक संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उंटावद येथील किसान दुध उत्पादक सहकारी सोसायटी लिमिटेडच्या कार्यालयात दुध उत्पादकांची बैठक संपन्न झाली.

उंटावद तालुका यावल येथे जिल्हा दूध संघ जळगाव व Indian immanological Limited (एन.डी.डी.बी) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर दुध उत्पादनाबाबतीत दुध उत्पादकांना मार्गदर्शन करण्यात येत असून याच पार्श्वभुमीवर उंटावद येथे दूध उत्पादकांना मार्गदर्शन करण्यात आले.

किसान दुध उत्पादक सह. सोसा. लि. उंटावदच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात संकरीत गाई, त्यांचा भाकड काळ, दूध उत्पादन कसे वाढवावे, जंतनाशक गोळ्यांचे महत्त्व काय व त्या दर तीन महिन्यानी सर्व जनावरांना द्याव्यात, मिनरल मिक्चर का दिले पाहिजे ? त्याचा जनावरांच्या शरीराला काय फायदा होतो ? तसेच पशुखाद्याचे फायदे काय ? आदींसह इ.सह दुग्ध व्यवसायावर आधारीत विषयांवर निकितेश निर्मळ सीनियर ऑफिसर इंडीयन इमानोलाँजीकल (एन.डी.डी.बी) यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा दूध संघाचे रूट पर्यवेक्षक सचिन जंगले हे देखील उपस्थित होते. दुध उत्पादनाबाबतीत मार्गदर्शन केल्यानंतर दुध उत्पादकांनी विचारलेल्या शंकाचेही निकितेश निर्मळ यांनी निरसन केले. यावेळी चेअरमन रामदास धनजी पाटील, व्हा.चेअरमन विवेक गणपत पाटील, संचालक दिनकर देवराम पाटील, कैलास ताराचंद पाटील, अशोक बाबूराव पाटील, ज्ञानेश्वर धुडकू पाटील, चंन्द्रकांत गणपत पाटील, विकास विवेक पाटील, सचिव महेश भागवत पाटील इ.सह दुध उत्पादक उपस्थित होते.

Protected Content