यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कृषी पिकांसाठी रासायनिक खतांच्या नियोजनासाठी जिल्हा कृषी विभाग, रासायनिक खत विक्रेते व शेतकरी यांची संयुक्त बैठक नुकतीच यावल पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत तालुक्यातील उपलब्ध रासायनिक खतांच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला आहे.सन 2022 खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यासाठी लागणाऱ्या रासायनिक खताचे नियोजन करण्यासाठी जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व जी.प.चे कृषी अधिकारी पी .एस .महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली आहे. या बैठकीस नियोजन अर्थ येथील पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीस तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे, पं.स. चे कृषी विस्तार अधिकारी डी.पी.कोते, डी.एस .हिवराळे, यावल तालुका असोसिएशनचे अध्यक्ष मनोज वायकोळे, माजी अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यात सद्या उपलब्ध असलेल्या साठ्याचा आढावा घेण्यात आला त्यानुसार तालुक्यात सध्या चार हजार ३०९ मेट्रिक टन खते उपलब्ध आहेत. त्यात युरिया १६५० मे. ट. फाॅस्पेटह् १८००, डी .एच .वन १० मे. टन पोट्याश २४० मेट्रिक टन ,संयुक्त खते ५२९ मेट्रिक टन असा साठा उपलब्ध आहे. आपला देश परदेशातून खताची आयात करीत असल्याने सध्या रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे खताची टंचाई भासू शकते. त्यामुळे तालुक्यात उपलब्ध असलेला साठा शेतक-यांनी खरेदी करावा असे आवाहन बैठकीत करण्यात आले. बैठकीस कृषी दुकानदार व शेतकरी उपस्थित होते.