पाचोरा येथे विजवितरण कंपनी, सरपंच व ग्रामसेवकांची संयुक्त बैठक

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन तीन महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे व स्ट्रीट लाईटचे विज कनेक्शन सातत्याने कापले जात असल्याने तालुकाभरातून अनेक सरपंचांचे फोन येत असल्याने आ. किशोर पाटील यांनी विजवितरण कंपनी सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्तरीत्या येथील राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये बैठक घेण्यात आली.

 

या बैठकिला उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, गटविकास अधिकारी अतुल पाटील, विजवितरण कंपनीचे उपाभियंता पाटील, राठोड, रविंद्र शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य दिपकसींग राजपूत, रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील,  अभय पाटील, सुमित किशोर पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, विस्तार अधिकारी राजकुमार धस, प्रविण ब्राम्हणे, आमदारांचे स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील सह विविध गावांतील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

यावेळी विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला वरीष्ठ पातळीहून वसुलीचे सक्त आदेश असल्याने वसुली मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचे व स्ट्रीट लाईटचे विज कनेक्शन कट करावे लागत आहे. यावेळी अनेक ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीची वसुली होत नाही व १५ व्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्यासाठी मार्च – २०२० / २०२१ मध्ये आराखडा तयार करून त्यातून करावयाच्या कामांचे नियोजन झालेले आहे. याशिवाय कामात बदल करावयाचा असल्यास त्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांची परवानगी लागत असल्याने १५ व्या वित्त आयोगातुन विज बिल भरणे शक्य नसल्याचे सांगितले. यावर आमदार किशोर पाटील यांनी शासनाने मार्च – २०२१ पुर्वीची विज बिल भरण्याचे परिपत्रक शासनाने काढले असून ज्या गावांनी २०२१ नंतरची विज बिल ग्रामपंचायतीच्या कर वसुलीतुन भरलेली नसतील अशा गावातील सरपंच व ग्रामसेवकांना त्या खुर्चीवर बसण्याची लायकी नसल्याचे सांगुन आमदार किशोर पाटील यांनी ज्या गावातील ग्रामसेवकांनी मार्च अखेर ग्रामपंचायतींची ५० टक्के वसुली केलेलीअशा ग्रामसेवकांना वर बोट करण्यास आवाहन केले असता एकाही ग्रामसेवकाने ५० टक्के वसुली केलेली नसल्याने आ. पाटील यांनी नाराजी व्यक्त करुन ग्रामसेवकांची चांगलीच कानउघाडणी करुन ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना व स्ट्रीट लाईटचे विज कनेक्शन कट होण्याचे खापर ग्रामसेवकांवर फोडले. तर सरपंचांही आपले अधिकार व कर्तव्ये जाणुन घेवून वसुलीस अडथळा निर्माण न करता सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी लोहारा येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, वरखेडी येथील सरपंच धनराज विसपुते यांनी विज वितरण कंपनीचे कर्मचारी ग्रामपंचायतीला कोणतीही पुर्व सुचना न देता विज कनेक्शन कट करतात. व आमच्या कडे असलेल्या सब स्टेशनचे अनेक वर्षांपासून असलेले भाडे दिलेले नसल्याची तक्रार केल्याने आ. पाटील यांनी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही चांगलेच खडसावले.

 

यावेळी सरपंच सुदाम वाघ, संतोष परदेशी, अक्षयकुमार जैस्वाल, वसंत पाटील, विशाल पाटील, शालीक पाटील, प्रविण पाटील, सुभाष पाटील, बबलू पाटील, डी. के. पाटील, राहुल पाटील, रणजित पाटील, शिवाजी परदेशी, शिवदास पाटील ग्रामसेवक नंदकुमार गोराडे, नितीन बोरसे, आबा पाटील, हितेश पाटील, शरद पाटील, सतीष सत्रे, एम. बी. कानफाडे, बी. पी. पाटील, संजय पाटील उपस्थित होते.

Protected Content