बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत जोगेंद्र कवाडे गट !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत आपण युती करणार असल्याची घोषणा पीआरपीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लीकन पक्षाने अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. याआधीच कवाडे यांनी एका पत्राच्या माध्यमातून आपल्या आगामी वाटचालीची भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, शिव, शाहू, फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा वैचारिक आधार आहे. महाराष्ट्राला विकासगामी करण्यासाठी व राज्यातील सर्व समाज समूहांच्या हक्कासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष कटिबद्ध आहे. यामुळे आम्ही त्यांच्या सोबत युती करणार असून थोर महामानवांच्या विचारावर आमची आघाडी वाटचाल करेल.

कवाडे यांनी पुढे म्हटले आहे की, या युतीच्या माध्यमातून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणार अहोत. तसेच आम्ही शिंदे यांच्याकडे ४१ जागा मागितल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Protected Content