भुसावळ प्रतिनिधी । लेवा पाटीदार बिझनेस नेटवर्कतर्फे गाडेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
याबाबत वृत्त असे की, युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी लेवा पाटीदार बिझनेस नेटवर्कतर्फे ५ मे रोजी गाडेगाव ता. जामनेर येथे सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नोकरी मेळाव्यात सुप्रिम इंडस्ट्रीज,जळगाव, प्लांटरुट प्रायव्हेट लिमिटेड कल्याण, पुना एंगीटेज भोसरी, दीप प्लास्टीक नाशिक, विश्व सीएनसी टेक्नोलॉजीस भोसरी पुणे, औरंगाबाद अॅटो एन्सीलरी ग्रृप वाळूज , औरंगाबाद, औरंगाबाद येथ्ील,शांतदिप मेटल्स, आर्पीक इंजिनिअरींग , साहिल अॅाटो टेक्नोलॉजिस, नरेश इंजिनिअरिंगज वर्क्स, टावर मशिनिज, अरुण अॅाटो, नरेश इंजिनिअरींग वाळूज, हेमंत इंजिनिअरींगज, सनकाज स्टिल्स या कंपनी तर दर्शन क्रेन्स नाशिक, अव्हेन्यू अॅग्री प्रॉडक्ट , दिंडोरी, वर्दम टेक्नोलॉजीज भोसरी पुणे या सह अनेक कंपन्या सहभागी असणार आहेत.
यासोबतच दीपस्तंभ फाऊंडेशनचे प्रा.यजुर्वेंद्र महाजन, गुगलचे सॉफ्टवेअर अभियंता आशिष कमल सुरेश चौधरी, सुप्रीम पाईपचे संजय प्रभु देसाई, सागर धनाड अध्यक्ष छत्रपती शिवाजी शेतकी व पर्यावरण संस्था, डॉ.नितीन तुकाराम खर्चे, यवतमाळ, राजेश बळीराम नेहते, उद्योजक नाशिक, ज्ञानदेव येवले उद्योजक पुणे, बाबुराव राणे, अनिल भोकरे स.कृषी अधिकारी जळगाव हे करिअर याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर महिला स्वयंरोजगारावर निता वराडे या मार्गदर्शन करणार आहेत. युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी गुरु कन्सल्टन्सी सर्व्हीसेस औरंगाबाद, पासकी जॉब कन्सल्टन्सी अॅण्ड प्लेसमेंट जळगाव,वैभव प्लेसमेंट नाशिक, निखील एन्टरप्रायसेस चिंचवड पुणे यासह इतरही जॉब प्लेसमेंट सहभागी होणार आहेत. या सामाजिक उपक्रमाशाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हयातील बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.