जेएनयू हिंसाचार : आझाद मैदानावरील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

Jnu

 

मुंबई वृत्तसंस्था । दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन पोलिसांनी सामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना त्रास होत असल्याचे कारण देत आझाद मैदानावर हलवले होते. अखेर या आंदोलक विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावरील आपले आंदोलन मागे घेतले आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील आमचे ठिय्या आंदोलन यशस्वी झाले असून आम्ही आमचे आंदोलन मागे घेत आहोत. पण आमचा विरोध कायम आहे, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील विद्यार्थ्यांचं गेल्या दोन दिवसांपासून ‘गेट वे ऑफ इंडिया’वर जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनीही उपस्थिती लावली होती. ‘गेट वे’वर आंदोलकांची गर्दी होत असल्याने मुंबई पोलिसांनी आंदोलनकांना आझाद मैदानात जाण्याची विनंती केली होती. विद्यार्थ्यांनी नकार दिल्याने आज सकाळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांची आझाद मैदानात पाठवणी केली.

Protected Content