फी वाढीविरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा तुफान राडा

JNU stu

नवी दिल्ली वृत्तसंस्था । हॉस्टेल फीमध्ये वाढ, ड्रेसकोड आणि हॉस्टेलच्या नियमात बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाबाहेर निषेध व्यक्त करत मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. याचवेळी विद्यापीठामध्ये आज पदवीप्रदान सोहळा सुरू असून या सोहळ्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित आहेत. काही विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी मोठ्या संख्येने सीआरपीएफ आणि दिल्ली पोलीसांच्या जवानांना तैनात केले आहे. दरम्यान, आक्रमक होत पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. हॉस्टेलमध्ये फी वाढ, ड्रेस कोड, संचारबंदी यासारखे निर्बंध लादण्यात आले आहे.

आंदोलनकर्त्या एका विद्यार्थ्याने सांगितले, आम्ही १५ दिवसांपासून आंदोलन करत आहोत. मात्र कुलगुरु आमच्याशी बोलण्यास तयार नाहीत. जेएनयूमध्ये जवळपास 40 टक्के विद्यार्थी गरीब आहेत. हॉस्टेलची फी 6 ते 7 हजार रुपयांनी वाढवली आहे. विद्यार्थ्यांना ही फी भरणे शक्य नाही. फी मध्ये अचानक होणारी वाढ अन्यायकारक आहे. तर दुसरा विद्यार्थी म्हणाला, जेएनयू हे अनुदानित विद्यापीठ आहे त्यामुळे इथे गरीब विद्यार्थीही शिक्षण घेतात. जर विद्यापीठ होस्टेलची फी वाढली तर गरीब विद्यार्थी इथे कसे शिक्षण घेऊ शकतील?

Protected Content