यावल प्रतिनिधी | राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त मनुष्यबळ लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या मार्फत यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव पुरस्कार जितेंद्र शांताराम गुरव यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
जितेन्द्र गुरव हे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंगळवाडे ता.अमळनेर येथे आदीवासी आश्रमशाळावर ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.त्यांचे अध्ययन अध्यापना सोबत आदीवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढा देणे , त्याचबरोबर विविध सामाजीक उपक्रम राबविणे ,कोविड १९ संचारबंदीच्या काळातील आदीवासी पाडयांवर आरोग्य उपक्रम राबविणे असा सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. या कार्यक्रम प्रसंगी राज्य शिक्षण संचालक,महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे आयुक्त,मणुष्यबळ विकास अध्यक्ष कृष्णा जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.पुरस्कार आँनलाईन झुप अँपद्वारे दिमाखात सोहळा पार पडला.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आदिवासी विकास अप्पर आयुक्त संदिप गोलाईत अमळनेर तालुका गटशिक्षणअधिकारी आर. डी. महाजन, यावल येथील आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी यांच्यासह आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एम डी पिंगळे, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आदिवासी कॉंग्रेस सेलचे यावल तालुका अध्यक्ष बशिर तडवी,आदिवासी लोकसंघर्ष खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे,महाराष्ट्र रोजंदारी कृतीसमिती राज्यप्रमुख महेश पाटील,संतोष कापुरे यावल तालुक्यातील विविध आदीवासी सेवाभावी संघटना यांनी जितेन्द्र गुरव सरांचे अभिनंदन केले आहे. मला मिळालेला पुरस्कार माझे मूख्याध्यापक,शिक्षक,विदयार्थी यांना त्याचे श्रेय जाते असे जितेन्द्र गुरव यांनी नमूद केले आहे.