जिओ फायबर युजर्सना मिळणार 199 रुपयांत “एक टीबी डेटा”

jio

नवी दिल्ली वृत्तसंस्था । रिलायन्स जिओ फायबर युजर्सना आता कंपनीकडून 199 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरवर तब्बल ‘एक टीबी डेटा’ (1000GB) डेटा दिला जात असून या प्लॅनमध्ये आतापर्यंत केवळ 100GB डेटा मिळत होता. त्याचबरोबर या प्लॅनच्या वैधतेमध्ये कोणताही बदल केलेला नसून अद्यापही सात दिवस इतकीच वैधता आहे.

प्लॅनमध्ये झालेल्या या बदलाचा फायदा जिओ फायबरचे जे ग्राहक 699 रुपये आणि 849 रुपयांच्या बेसिक प्लॅन्सचा वापर करतात त्यांना होणार आहे, कारण या दोन्ही प्लॅनमध्ये FUP मर्यादा आहे. तर, तब्बल एक टीबी डेटा असल्यामुळे 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा संपण्याची अधिक चिंता राहणार नाही. लाँचिंगवेळी महागडे प्लॅन्स असल्यामुळे JioFiber ला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून प्लॅन्स आणि टॉप-अप व्हाउचर्समध्ये बदल केले जात आहेत.

जिओ फायबरच्या तुलनेने एअरटेलचे प्लॅन अधिक फायदेशीर असल्यामुळेच जिओ फायबरला 199 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरमध्ये 100जीबी डेटा वाढवून तब्बल 1टीबी करावा लागल्याची चर्चा आहे.

Protected Content